हरयानात आणखी एका हेराला अटक   

चंडीगढ : हरयानातील आणखी एकाला रविवारी हेरगिरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अमन, असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या संशयावरुन त्याला अटक केली आहे.
 
यापूर्वी हरयानातील यूट्यूबर ज्योती मल्होत्राला नुकतीच हेरगिरी प्रकरणी अटक केली होती. तिने पाकिस्तान, चीनचा दौरा केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर केलेली ही दुसरी कारवाई आहे. हरयानातील नूह जिल्ह्यात पोलिसांनी छापा घालून अमन (वय-२६) याला अटक केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तो लष्करी ठाण्यांची आणि हालचालींची संवेदनशील माहिती पाकिस्तान उच्च आयुक्तालयाच्या माध्यमातून पाठवत असल्याचे उघड झाले. त्याच्या अटकेमुळे प्रकरणातील आरोपींंची संख्या आता तीन झाली आहे. या पूर्वी देवेंद्र सिंग याला अटक केली होती. 

Related Articles